आमच्याबद्दल

गावाचे ऐतिहासिक / भौगोलिक महत्व

संसरी गाव हे नाशिक तालुक्यात नाशिक जिल्ह्यातील दारणा नदी लगत वसलेले सुंदर गाव आहे . गावाच्या पूर्वेस दारणा नदी प्रवाहित होत असून नदीस बारमाही पाणीपुरवठा असतो . गावाच्या तर पश्चिमेस व दक्षिणेस देवळाली कटक मंडळ आहे उत्तरेस बेलतगव्हाण गाव लागून आहे संसरी हे गाव नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असलेले सुजलाम व सुफलाम असे गाव असून येथील पर्जन्यमान १२० ते १३० असे असते . संसरी गाव हे नाशिक पासून उत्तर दिशेला १८ किलोमीटर अंतरावर असलेले आहे संसरी गावचे भौगोलिक क्षेत्र 631.53 इतके आहे गावात दुग्ध- पशुपालन व शेती हा मुख्य व्यवसाय असून गहू ,भात, द्राक्ष, बाजरी, पालेभाज्या, कडधान्य यांची लागवड केली जाते

सांस्कृतिक व राजकीय वारसा

संसरी गावातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ .नामदेवराव शिवराम गोडसे यांनी स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्र गोवा मुक्ती चवळीत सहभाग घेतला असून त्यांनी ०१ वर्ष  तुरुंगवास सहन केला होता तसेच स्वर्गीय मा.खा .राजाभाऊ गोडसे हे एकदा सर्व प्रथम शेतकरी कुटुंबांतून नाशिक जिल्ह्याचे खासदार झाले तर त्यांच्या नंतर मा.खासदार श्री .हेमंत तुकाराम गोडसे हे सन – २०१४ ते सन – २०२४ पर्यंत सलग १० वर्ष नाशिक जिल्ह्याचे खासदार होते .

तसेच विषेश बाब अशी की

संसरी या गावाने योग्य नियोजनातुन विकास कामे केलेली असून  संसरी गाव हे सन- २००६/२००७ साली  हागणदारी मुक्त झालेले आहे. सन – २००८ साली भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती .प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार  व सन्मान पत्र देण्यात आलेला आहे .तसेच संत गाडगे बाबा तालुका स्तरीय पुरस्कार सन – २००५/२००६ साली प्राप्त झाला . स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संसरी  गावांमध्ये स्वच्छता चळवळीची सुरुवात सन –  २००६/२००७ पासून झाली तर  भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या धोरणानुसार गाव पातळीवर नाशिक पंचायत समिती मार्फत समुदाय संचलित स्वच्छता आराखडा तयार करण्यात येऊन ग्राम स्वच्छतेची गाव स्तरावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.  संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्राम स्वच्छता, आरोग्य ,शुद्ध  पाणीपुरवठा, सामाजिक सुरक्षा  बाबत ग्रामसभा व महिला सभा च्या माध्यमातून जनजागृती केली जाते व प्रभात फेरी घेऊन गावात विविध स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येतात. केंद्र व राज्य स्तरावरील सर्व अभियानात संसरी ग्रामपंचायत हि अग्रेसर असते तसेच शासन स्तरावरील सर्व योजना आणि अभियानाची प्रखरपणे अंमलबजावणी करण्यात येते  .

कर्मचारी वर्ग

• ग्रामपंचायतीचे विकास कामे

आरोग्य सुविधा

संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्राथमिक  आरोग्य उपकेंद्र – संसरी स्थित असून सर्व आरोग्य विषयक सुविधा देण्यात येत असतात या ठिकाणी सेवक वर्ग मध्ये एक आरोग्य समुदाय अधिकारी , एक आरोग्य सेवक . एक आरोग्य सेविका , व लोकसंख्येच्या समप्रमाणात ०५ आशा वर्करस कार्यरत आहे

संसरी  ग्रामपंचायत कार्यक्षेत्र ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून सदर योजने अंतर्गत संपूर्ण गावात सदर योजनेअंतर्गत ०२ पाणी पुरवठा विहिरीतून गावास  पाणीपुरवठा केला जातो तर  चार लक्ष लिटर  क्षमतेचा जलकुंभ कार्यान्वित आहे सदर नळ पाणी पुरवठा करणे कामी ऐकून – ०२ पाणी पुरवठा कर्मचारी हे पाणी पुरवठाचे कामकाज पाहत असतात  तसेच नव्याने सुरू असलेली केंद्र शासन निधी अंतर्गत  जलजीवन मिशन योजना अंतर्गत  नळ पाणी पुरवठा योजनेचे अनुदान रक्कम रुपये – ३,४८,६०,३१४ /-  लक्ष इतक्या रक्कमेचे योजनेचे  काम सुरु असून ते  पूर्णत्वाकडे आहे तसेच संसरी  ग्रामपंचायत हद्दीतील – ६२८  नळ कनेक्शन धारक खातेदार असून त्याच नियमित पाणीपुरवठा केला जातो तर संसरी  ग्रामपंचायती देण्यात आलेला छावणी परिषद देवळाली यांच्या सौजन्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याकरता 18000 लिटर क्षमतेचा जलकुंभ व  संसरी ग्रामपंचायत अंतर्गत  जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्प ( WAER  ATM ) नियमितरित्या  कार्यान्वित असतो

  • संसरी  गावात एकूण – १४४० कुटुंब असून त्यापैकी १२९८ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयाचा वापर करतात तर 142 कुटुंब हे सार्वजनिक शौचालयाला जोडलेले असून ते संसरी  ग्रामपंचायतीचे सार्वजनिक शौचालय संख्या – ९८ असून त्याचा नियमितरित्या  वापर करीत असून संसरी गावातील  १००% नागरिक  शौचालयाचा वापर करत आहे संसरी  गावात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात   5.50 km इतक्या लांबीचा अंतर असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन करनेकामी  ग्राम पंचायत स्तरावर  भूमिगत गटार करण्यात आलेल्या असून सर्व कुटुंबाचे सांडपाणी ही भूमिगत गटारीना  जोडण्यात आलेले आहे .तसेच सांडपाण्याची विल्हेवाट  गावाचे शेवटी असलेल्या स्थिरीकरण तळ्यात केली जाते .तसेच सन –  2024-25 मध्ये जिल्हा परिषद  स्तरावरून SBM  टप्पा -२  अंतर्गत व  ग्रामपंचायतचे 15 वित्त आयोग निधी यांच्या एकत्रित निधी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट ( WTP ) निधी मंजूर असून सदर कामाचे जिल्हा परिषद स्तरावर निविदा मागविण्यात आलेल्या असून सदरचे काम प्रगतीपथावर आहे. संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घंटागाडी द्वारे ओला व सुका कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट सध्यस्थितीत देवळाली कटक मंडळ यांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट ( WTP ) येथे केली जाते . स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण SSG – 2025 यावर्षी दिनांक – 25 जून 2025 पासून संपूर्ण देशात राविण्यात येत असल्याने प्राविण्य पूर्ण कामकाज करीत आहे तसेच संसरी ग्रामपंचायत अंतर्गत ऐकून ०९ स्वच्छता कामगार कार्यरत असून ते दैनदिन स्वच्छतेचे कामकाज करीत असतात .

संसरी गावातील ८० %  रस्त्यांचे कॉक्रिटकरण पुर्ण झालेले आहे तर शेत रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर असून पूर्णत्वाकडे आहे.

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ऐकून – २२५ विद्युत स्तंभ चालू अवस्थेत असून सोलर दीप स्तम्भ – ३५ नग हे खासदार निधीतून बसविण्यात आलेले आहे . तर संसरी ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोग निधी व स्व निधीतून वस्ती अंतर्गत १५ सोलर स्तंभ बसविण्यात आलेले आहे .

संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी केंद्र क्र ०१ ते ०५ , शाळा , ग्रामपंचायत कार्यालय , तलाठी कार्यालय , आरोग्य उपकेंद्र यांना रेन वोटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यात आलेली आहे .

संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ऐकून अंगणवाडी केंद्र क्रमांक – ०१ ते ०५ वस्तीनिहाय कार्यरत असून ऐकून – ०५ अंगणवाडी कार्यकर्ती व ०५ अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहे .

संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद नाशिक सेमी इंग्लिश ची इयता ०१ ली ते ०८ वी पर्यंत प्राथमिक शाळा असून ऐकून ऐकून – ०४ शिक्षक कार्यरत आहे . प्रशस्त दुमजली जिल्हा परिषद शाळा इमारत असून स्वतंत्र किचनशेड , स्वच्छता गृह , ग्रीन जिम , परसबाग , वाचनालय , सुविधा कार्यरत आहे. व सदर शाळा हि ISO मानाकन प्राप्त आहे

संसरी येथील ग्रामपंचायत हि ISO मानाकन प्राप्त ग्रामपंचायत कार्यालय असून सन –   २०१६ साली जनसुविधा योजनेतून सदर इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे सदर कार्यालयात प्रशस्त सभागृह , प्रशासकीय कार्यालय , आपले सरकार सेवा नागरी सुविधा केंद्र , सरपंच / उपसरपंच दालन व स्वच्छता गृह व्यवस्था आहे. ग्रामपंचायत कार्यालयात ऐकून – आस्थापना अंतर्गत ०३ कार्यालयीन कर्मचारी व ०१ संगणक परिचालक कार्यरत आहे . आपले सरकार सेवा नागरी सुविधा केंद्र मार्फत सर्व प्रकारच्या ONLINE / OFLINE सुविधा नागरिकांना मागणीनुसार पुरविण्यात येत असतात .

देवळाली कॅम्प ,  अंतर ०१  किमी.

०८

संसरी गावाचे कृषी क्षेत्र हे अत्यल्प असून कृषी विभागामार्फत कृषी योजना / PM किसान सन्मान निधी योजना / कृषी साहित्य / मार्गदर्शन केले जाते

संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात  महाराष्ट्र ग्रामींन जीवनोती अभियान , पंचायत समिती नाशिक अंतर्गत ऐकून ३३ महिला बचतगटांची स्थापना करण्यात आलेली असून महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिलास व्य्स्वसायासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो तसेच लखपती दीदी या योजनेचा देखील लाभ देण्यात आलेला आहे . ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरण साठी व्यवसाय प्रशिक्षण देखील दिले जाते .

संसरी गावात मारुती मंदिर , भैरवनाथ मंदिर , विठल मंदिर ,गणपती मंदिर , साई  बाबा मंदिर ,महादेव मंदिर , मरी माता मंदिर असे प्रमुख मंदिरे आहेत

ग्रामपंचायतीचे आर्थीक उत्पन्न अत्यंत कमी असतांना देखील व्यापारी गाळे व्यतिरिक्त ग्रामपंचायतीस आर्थिक उत्पन्नाचे अन्य साधन नसताना देखील पारदर्शक नियोजनातुन पुढील विकासाचे कामे केलेले आहे.

ग्रा मपंचायतीने उत्पन्न अत्यंल्प असल्याने ग्रामपंचायतीने १६ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले आहे. सन – २००६/२००७  वर्षात ग्रामपंचायतीने  जिल्हा परिषद कडील ग्रामनिधी कर्जातून १५  लाख कर्ज घेवुन १३ गाळे असून करेतर उत्पन्न संसरी ग्रामपंचायतीस प्राप्त होत आहे .

ग्रामपंचायती मार्फत व म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत रस्ते दुतर्फा ३ कि.मी, व बंधारा लगत पडीक जागेत तसेच प्रत्येक शेतक-याच्या बांधावर सर्वाधिक ५२५० वृक्ष लागवड करून यशस्वी संगोपन करण्यात येत आहे

ग्रामपंचायतीने पाटपुरवा करून दानशूर व्यक्ती श्री वासुशेट श्रॉफ यांच्या माध्यमातून पुढील विकास कामांकरीता सि.एस.आर निधी प्राप्त करून घेतला आहे.व बांधकाम करून दिलेले आहे

अ ) जिल्हा परिषद शाळा आर.सी.सी. इमारत  व स्वच्छता गृह

आ ) प्रशस्त स्मशान भूमी

इ ) सार्वजनिक मंगल कार्यालय

गावात अंतविधी करीता संसरी गावात पुरेशी जागा उपलब्ध नव्हती परंतु ग्रामपंचायतीने दारणा नदी लगत दानशूर व्यक्ती श्री वासुशेट श्रॉफ यांच्या माध्यमातून CSR निधीतून व जनसुविधा निधी अंतर्गत आर.सी.सी इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे .

संसरी येथील पशु वैद्यकीय दवाखाना हा ०३ किमी अंतरावर भगूर येथे असून त्यांच्या मार्फत पशु चिकित्सा केली जाते

संसरी गावात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात  50 km इतक्या लांबीचा अंतर असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन करनेकामी  ग्राम पंचायत स्तरावर  भूमिगत गटार करण्यात आलेल्या असून सर्व कुटुंबाचे सांडपाणी ही भूमिगत गटारीना  जोडण्यात आलेले आहे .तसेच सांडपाण्याची विल्हेवाट  गावाचे शेवटी असलेल्या स्थिरीकरण तळ्यात केली जाते

संसरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मुलांना खेळण्यासाठी ग्रामपंचायतीचे स्वनिधीतून भैरव नाथ मंदिर येथे मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आलेले आहे तर जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक व ग्रामपंचायतीचे १५ वित्त आयोग निधीतून व्यायामशाळा इमारत , साहित्य घेण्यात आले असून कुस्तीपटू साठी आखाडा शेडचे बांधकाम करण्यात आलेले आहे .