A spacious building constructed through savings of over ₹30 lakh.
First rank in the R.R. Aaba Patil Scheme 2022–23
Karanjwan Dam – The Lifeline Project of Nashik District
यशोगाथा
ग्रामपंचायतीचे विकासदृष्टीकोन आणि आर्थिक नियोजन
ग्रामपंचायतीकडे उत्पन्न अत्यल्प असतानाही काटकसरी आणि योग्य नियोजनातून २३ लाख रुपये बचत करून नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. तसेच १४ वित्त आयोग निधीतून सभोवतालच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. व्यापारी गाळे उभारणीमध्येही ग्रामपंचायतीने प्रभावी नियोजन केले असून, अंदाजे १८ गाळे मंजूर असूनही प्रत्यक्षात २३ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गावात अंतविधीच्या सुविधेसाठी आर.सी.सी. अमरधाम, जलसंधारणासाठी सिमेंट बंधारे, पाणी ए.टी.एम., ट्रॅक्टर खरेदी, आणि विविध शासकीय योजनांतून सीएसआर निधीच्या सहाय्याने अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले आहेत.
समाजघटक विकास, आरोग्य व शैक्षणिक सुविधा
करंजवण ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक, व आदिवासी वस्तीतील नागरिकांसाठी भरीव विकासकामे केली आहेत. पंचशील नगर, अण्णा साठे नगर, इंदिरा कॉलनी आदी वस्त्यांमध्ये १००% भुमिगत गटारी, कॉक्रीट रस्ते, एलईडी लाईट्स, स्वतंत्र शौचालये आणि डिजिटल शिक्षणासाठी टीव्ही देण्यात आले आहेत. आदिवासी वस्तीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण “ठक्कर बाप्पा योजनेतून” करण्यात आले आहे. करंजवण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाल्याने आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे. गावात अँम्बुलन्स आणि वैकुंठ रथ देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, धार्मिक पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पायऱ्या, लोखंडी पूल व पेव्हर ब्लॉकचे काम तिर्थक्षेत्र विकास निधीतून प्रगतीपथावर आहे.
स्वच्छता, पाणीपुरवठा व पर्यावरण संवर्धनात आदर्श
करंजवण हे दिंडोरी तालुक्यातील एक आदिवासी भागातील गाव असून सुमारे ४ हजार लोकसंख्या असलेले आहे. गावाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १००% हागणदारीमुक्ततेचा टप्पा पार केला आहे. जलसंपदा विभागाची पाणीपुरवठा विहीर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली असून ६१६ विशेष नळ कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन योजना प्रगतीपथावर आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गावाने तब्बल २२,५०० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले असून, ही एक राज्यपातळीवरील मोठी कामगिरी ठरली आहे. गावातील भुमिगत गटारी, कॉक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक बसवलेले प्रशस्त पटांगण इत्यादी कामे देखील प्रभावीपणे पार पाडली आहेत.
कोणताही प्रश्न विचारण्यासाठी कॉल करा : +91 92717 68312
श्री. सुभाश हरी गायकवाड
अधिक माहितीसाठी
+91 98341 23892
करंजवणची गौरवशाली कामगिरी

+91 92717 68312
Ambulance

02557 221 033
Police
आगामी कार्यक्रम व बातम्या
लोकसंख्या आकडेवारीद्वारे गावातील नागरिकांची संख्या, लिंगानुपात, वयोगट व कुटुंबसंख्या याचा सविस्तर आढावा
0+
१. गावाची लोकसंख्या
0+
एकूण कुटुंब संख्या
0+
दारिद्र रेषा खालील कुटुंब संख्या
0
गावातील मतदार संख्या
योजना
प्रधानमंत्री आवास, जल जीवन मिशन, रमाई, शबरी, मोदी आवास व अन्य योजनांद्वारे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, घरे, पाणी व रोजगाराची उपलब्धता वाढवली जाते.












स्वयंसेवक बना, आपल्या गावाची सेवा करा आणि बदल घडवा!
Support Mail
Grampk13@gmail.com
Learn more about our great achievement from blog
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Lorem Ipsum has been rode.

दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत संसरी कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार मुख्यमंत्री ग्राम




