दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत संसरी कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, महिला बचत गट सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ सर्व शासकीय विभागांची कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर कार्यक्रमास थेट प्रक्षेपणाद्वारे सुरुवात करण्यात येऊन सदर अभियानाच्या एकूण सात थीम बाबत माहिती देऊन अभियानात सर्व विभागांनी व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सदरच्या अभियान दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याबाबत ग्रामस्थांनी पूर्ण तयारी दर्शवली, सदर अभियानांतर्गत स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प ,हिमोग्लोबिन तपासणी व इतर चाचण्या चे आयोजन सदर अभियान कार्यकाळात करण्यात आले ग्रामसभेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ,सार्वजनिक शौचालय स्वच्छ भारत मिशन ,सौभाग्य राज्य योजना, जलजीवन मिशन, हेल्थ कार्ड आरोग्य, विमा पंतप्रधान जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन धन योजना ,रमाई आवास योजना ,आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री लाडकि बहिण योजना व कन्या भाग्यश्री योजना व केंद्राच्या व राज्याच्या इतर शासकीय विनाबाबत माहिती देऊन त्याबाबत जनजागृती करण्यात आली व सर्व ग्रामस्थांना या अभियानात सहभाग घेण्याबाबत उस्फुर्त प्रतिसाद दिला
